अल्पवयीन विद्यार्थिनीची विवस्त्र तपासणी


चोरीच्या आरोपाचा ताण सहन न झाल्याने संपवलं आयुष्य

बागलकोट
शाळेच्या आवारातून दोन हजार रुपये चोरीला गेल्याच्या प्रकरणात एका अल्पवयीन मुलीसह चार मुलींची तपासणी करण्यात आली. शिक्षिकेच्या पर्समधून दोन हजार रुपये चोरीला गेल्याने विद्यार्थिनींची कपडे काढून तपासणी करण्यात आली. हा ताण सहन झाल्याने अल्पवयीन मुलीने आयुष्य संपवलं आहे. या मुलींना जवळच्या मंदिरात नेण्यात आलं. त्याआधी कपडे काढून त्यांची तपासणी करण्यात आली होती. हा ताण सहन न झाल्याने एका मुलीने आयुष्य संपवलं.
कर्नाटकमधल्या बागलकोट या ठिकाणी सरकारी शाळेत ही घटना घडली आहे. शनिवारी शिक्षिकेच्या पर्समधून पैसे चोरीला गेले. त्यानंतर या अल्पवयीन मुलीसह चार जणींना बोलवण्यात आलं. त्यांचे कपडे काढून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना मंदिरात नेऊन देवाची शपथ घ्या आणि चोरी केली नाही हे सांगा असे सांगण्यात आलं. या सगळ्या प्रकाराचा ताण सहन न झाल्याने १४ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

Advertisement

बागलकोटचे पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांनी याबाबत माहिती दिली. ज्या मुलीने आयुष्य संपवलं तिची मोठी बहीणही याच शाळेत जाते. शनिवारी शाळेत काय घडलं? तो प्रकार तिने आई वडिलांना सांगितला. या मुलीच्या आई वडिलांनी सांगितलं की आमची मुलगी खूपच संवेदनशील होती. दोन दिवसांपासून ती कुणाशीही काही बोलत नव्हती. तिने तिचं आयुष्य संपवलं आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!