ईव्हीएमबाबत याचिका फेटाळली
सर्वोच्च न्यायाल्याचा याचिका स्वीकारण्यास नकार
नवी दिल्ली
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सच्या (ईव्हीएम) कामात अनियमितता असल्याचा आरोप करणारी याचिका स्वीकारण्यास नकार देताना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रत्येक पद्धतीचे प्लस आणि मायनस पॉइंट्स असतात असे मत नोंदवलेन्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपंकर दत्ता आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठाने सांगितले की, या न्यायालयाने यापूर्वीच अनेक याचिकांची वेळोवेळी तपासणी केली आहे आणि ईव्हीएमच्या कामकाजाशी संबंधित विविध समस्या हाताळल्या आहेत.
“आम्ही किती याचिकांवर विचार करू? अलीकडेच आम्ही व्हीव्हीपीएटीशी संबंधित एक याचिका हाताळली आहे. आम्ही गृहितकांवर जाऊ शकत नाही. प्रत्येक पद्धतीचे प्लस आणि मायनस पॉइंट्स असतात. आम्ही कलम 32 अंतर्गत यावर विचार करू शकत नाही,” असे खंडपीठाने याचिकाकर्त्याला सांगितले.
नंदिनी शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत उपस्थित करण्यात आलेला मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने विविध याचिकांमध्ये तपासला असल्याचे खंडपीठाने आदेशात नोंदवले.
न्यायमूर्ती खन्ना म्हणाले की, न्यायालयाने वेळोवेळी 10 हून अधिक प्रकरणांची तपासणी केली आहे.
शर्मा यांनी आपल्या याचिकेत भारतीय निवडणूक आयोग आणि सहा राजकीय पक्षांना पक्षकार म्हणून उभे केले होते
