साताऱ्यात रविवारी स्वर-चारुहास’ संगीत कार्यक्रम


सातारा:
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, सातारा आणि ‘संगीतप्रेमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक १ नोव्हेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५:३० वाजता ‘स्वर-चारुहास’ या संगीत कार्यक्रमाचे शानदार आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शनिवार पेठ येथील दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉलमध्ये पार पडणार आहे.
या सांगीतिक महोत्सवात मुख्य गायक कलाकार म्हणून चारुहास सप्रे, विनयकुमार आणि स्वरा देशपांडे आपल्या सुमधुर सुरांनी सातारकरांना मंत्रमुग्ध करणार आहेत. कार्यक्रमाचे बहारदार निवेदन राजेंद्र पाटील करणार असून, या कार्यक्रमाची संकल्पना प्रमोद लोंढे यांची आहे.
या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून हेमंत कासार, मनोज तपासे आणि दीपलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक-अध्यक्ष मा. शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत.
या सुश्राव्य संगीतमय कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी साताऱ्यातील संगीतप्रेमी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!