अजित पवार यांचे विमान अपघातात निधन


लाडक्या नेत्याच्या मृत्यूमुळे महाराष्टावर शोककळा

मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी मुंबईहून बारामतीला जात असताना झालेल्या विमान अपघातात निधन झाले. या अपघातात वैमानिक आणि पवार यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांसह इतर चार जणांचाही मृत्यू झाला आहे. लाडक्या नेत्याच्या मृत्यूमुळे महाराष्टावर शोककळा पसरली आहे
मुंबईहून सकाळी ८ च्या सुमारास उड्डाण घेतलेले छोटे विमान ४५ मिनिटांनी लँडिंगच्या प्रयत्नात बारामती विमानतळाजवळ कोसळले. या अपघातात विमानातील पाचही प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने दिली.

66 वर्षीय अजित पवार हे ज्येष्ठ राजकारणी आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांचे पुतणे आणि लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांचे चुलत भाऊ होते. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीत असलेले शरद पवार आणि सुळे लवकरच पुण्याला रवाना होणार आहेत.

Advertisement

महाराष्‍ट्रात याना त्‍या कारणाने नेहमीच चर्चेत असलेल्‍या काही मोजक्‍याच नेत्‍यांपैकी एक म्‍हणजे अजित पवार. २ जुलै २०२३ पासून आपल्या मृत्यूपर्यंत उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते.२०२२-२३ या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले त्यांनी १९९१ पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते सर्वाधिक वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले असून, ते पाचवेळा या पदावर होते.
२०१९ मध्ये, त्यांनी भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे. परंतु ३ दिवसात दोघांनी राजीनामा दिला. २०२३ मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, यामुळे राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली. तसेच अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर देखील हक्क सांगितला.

अजित पवार यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली.अजित पवार यांनी १९८२ साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली.पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी १९९१ साली त्यांची निवड झाली. १६ वर्ष ते त्या पदावर होते


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!