सातारा येथे २८ डिसेंबरला ब्राह्मण वधुवर मेळावा


अखिल ब्राह्मण महासंघ सातारा यांच्यातर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील अखिल ब्राह्मण महासंघ सातारा यांच्यातर्फे सातारा येथे २८ डिसेंबरला ब्राह्मण वधुवर मेळावा आयोजित करण्यात आला आहे.हा मेळावा महिला मंडळ हॉल, राजवाडा बसस्टॉप जवळ, मारुती मंदिरा समोर, सातारा येथे होणार आहे. मेळाव्यास हजर राहण्यासाठी अगोदर नोंदणी करणे आवश्यक आहे.दुपारी दीड ते पाच या वेळेत होणाऱ्या या मेळाव्यामध्ये वधूंची नोंदणी मोफत केली जाणार आहे. त्याचबरोबर मेळाव्यास उपस्थित वधूंचा लकी ड्रॉ काढून पैठणी मोफत मिळणार आहे. या वधू वर मेळाव्यास पुणे कोल्हापूर सांगली येथून वधु वर उपस्थित राहणार असून खात्रीने तुमच्या वधूला अथवा वराला मनासारखे स्थळ या मेळाव्यात मिळू शकणार आहे. वरांच्या नोंदणीसाठी रुपये 1000 एवढे शुल्क असून यामध्ये वर्षभर व्हाट्सअप वर स्थळे पाठवली जाणार आहेत. याच शुल्कामध्ये सुमारे 100 मुलींची स्थळे प्रत्यक्ष कॉपी द्वारे दिली जाणार आहेत. नोंदणी करिता श्री प्रशांत आठवले 7499186031 येथे संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री धनंजय कुलकर्णी आणि सर्व संचालकांनी केलेले आहे.
अखिल ब्राह्मण महासंघ सातारा ही महाराष्ट्र शासन नोंदणीकृत संस्था असून संस्थेचे शासन नोंदणीकृत वधू वर सूचक केंद्र आहे. अनेक लोकांचे विवाह या केंद्रातून आजपर्यंत जमले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!