साताऱ्यात शनिवारी स्वरश्रद्धांजली कार्यक्रम


दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे आयोजन

Advertisement

सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेतर्फे शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी दुपारी दोन वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे स्वरश्रद्धांजली हा संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.कार्यक्रमाचे उद्घाटक शिरीष चिटणीस असून प्रमुख पाहुणे म्हणून मुकुंद फडके डॉक्टर लियाकत शेख उपस्थित राहणार आहेत. यावेळी संगीता कोल्हापुरे, दत्तात्रय डोईफोडे, संजय दीक्षित, उज्वल गोडबोले, प्रज्ञा लाटकर,स्वरदा राजोपाध्ये, वैभव फडतरे, पियुशा भोसले
,अथर्व रत्नाकर,स्वरा किरपेकर, शर्वरी जोशी, जान्हवी माळी गायन सादर करणार आहेत
सुधीर पाध्ये, राजेंद्र आफळे, विश्वनाथ पुरोहित, सागर जोशी, सचिन राजोपाध्ये, अमेय देशपांडे,अथर्व रत्नाकर, प्रज्वल जाधव, स्वरा किरपेकर, चैतन्य पटवर्धन साथसंगत करणार आहेत.
सर्वानी या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन दीपलक्ष्मी पतसंस्थेचे चेअरमन शिरिष चिटणीस यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!