बुधवारी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिर


सातारा

Advertisement

येथील सौ उज्वला श्रीकांत करंबेळकर यांच्यातर्फे बुधवार दिनांक 5 नोव्हेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक या कालावधीमध्ये महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले आहे.सातारा शहरातील मोरे कॉलनी येथील श्री महादेव मंदिर हॉल, शिवनगर गणेशोत्सव मंडळ येथे हे आरोग्य तपासणी शिबिर होणार असून यावेळी डॉक्टर श्रीमती शुभदा कुलकर्णी या स्त्रीरोग आणि स्त्रियांच्या समस्या यावर मार्गदर्शन करणार असून डॉ शुभांगी निमकर पित्त आणि संधिवात याबाबत मार्गदर्शन करणार आहेत या शिबिरात दोघेही मान्यवर डॉक्टर महिलांची तपासणी करून त्यांना योग्य औषधोपचार सुचवणार आहेत. औषधे मोफत देण्याचाही प्रयत्न या शिबिरात करण्यात येणार आहे. हे शिबिर सर्वांसाठी मोफत असून परिसरातील महिलांनी या आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन उज्वला करंबेळकर यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!