शुक्रवारी साताऱ्यात हिंदी गीतांची सुश्राव्य मैफिल.
दीपलक्ष्मी पतसंस्था व सुहाना सफर यांच्यातर्फे आयोजन-
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था व सुहाना सफर सिंगर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सांस्कृतिक हॉल येथे सदाबहार हिंदी गीतांची सुश्राव्य मैफिल आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर संदीप श्रोत्री, श्रीराम नानल, मुकुंद फडके, विजय साबळे शिरीष चिटणीस,विनायक भोसले उपस्थित राहणार आहेत.
सुहाना सफर सिंगर क्लबचे शिरिष खुटाळे, चंद्रशेखर बोकील, सचिन शेरकर, डॉक्टर सुनील पटवर्धन, सुहास पाटील, मिलिंद हर्षे, शिवकुमार ,धिरेन्द्र राजपुरोहित, चंद्रशेखर प्रभुणे, सुषमा बगाडे, ममता नरहरी, स्मिता शेरकर, कविता शिवकुमार ,सीमा राजपूत, स्वाती खैर,तरनुम सय्यद, दिपाली घाडगे हे कलाकार गाणी सादर करणार आहेत.
या कार्यक्रमाची संकल्पना व निर्मिती विजय साबळे यांची असून निवेदिका दिपाली गीते असणार आहेत.
या कार्यक्रमाची ध्वनी व्यवस्था सुभाष कुंभार पाहणार आहेत. सर्वांनी
या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिरिष चिटणीस व विजय साबळे यांनी केले आहे

