रविवारी साताऱ्यात ज्वेल्स ऑफ रफी कार्यक्रम
दीपलक्ष्मी पतसंस्था आणि हार्मनी ग्रुप यांच्यातर्फे आयोजन
सातारा
येथील दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आणि हार्मनी ग्रुप यांच्यातर्फे गाने जो दिल को छू ले या मालिकेअंतर्गत भाग ७४ वा ज्वेल्स ऑफ रफी या नावाने सादर होणार आहे रविवार दिनांक 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता दीपलक्ष्मी सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील तानसेन अशी ओळख असलेले जेष्ठ गायक मोहम्मद रफी यांचा स्मृतिदिन नुकताच झाला. त्यानिमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मोहम्मद रफी यांनी जी हजारो गाणी गायली त्यातली काही महत्त्वाची निवडक गाणी यावेळी रवींद्र खांडेकर, गीतांजली पाटील, संगीता हेंद्रे, धनश्री बागडे, रागिणी शिकलगार सादर करणार आहेत
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रवींद्र खांडेकर, लियाकत शेख,मुकुंद फडके आणि शिरीष चिटणीस उपस्थित राहणार आहेत
सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हार्मनीतर्फे रवींद्र खांडेकर आणि शिरीष चिटणीस यांनी केले आहे

