डॉ संदीप श्रोत्री यांच्या पुस्तकाचे शुक्रवारी प्रकाशन


गिरीप्रेमी आणि आम्ही पुस्तकप्रेमी समूहातर्फे आयोजन
सातारा
येथील डॉक्टर संदीप श्रोत्री यांनी लिहिलेल्या आणि हेडविग मीडिया हाऊस मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या कांचनगंगेच्या कुशीत या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शुक्रवार दिनांक 8 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजता पदमजी हॉल मराठा चेंबर ऑफ कॉमर्स टिळक रोड पुणे येथे होणार आहे गिरीप्रेमी पुणे आणि आम्ही पुस्तक प्रेमी समूह यांच्या संयुक्त विद्यमाने या प्रकाशन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे ज्येष्ठ गिर्यारोहकी गिरीप्रेमी उमेश झिरपे आणि हिमालयीन क्लबचे मानद सचिव डॉक्टर रघुनाथ गोडबोले यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार असून यावेळी अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉक्टर पराग काळकर असणार आहेत यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि ज्येष्ठ निसर्गप्रेमी लेखक प्राध्यापक डॉक्टर प्र के घाणेकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे याशिवाय कांचनगंगा शिखर पादाक्रांत करणारे गिर्यारोहकही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती लावणार आहेत कांचनगंगा भटकंती या विषयावरील स्लाईड शोही दाखवला जाणार आहे
सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन आम्ही पुस्तक प्रेमी समूह तर्फे आणि मराठी साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस आणि गिरी प्रेमीचे अध्यक्ष जयंत तुळपुळे यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!