अखिल ब्राह्मण महासंघातर्फे गुरुचरित्र पारायण सोहळा
25 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये यशवंत दत्तात्रय देवस्थान येथे आयोजन
सातारा
येथील अखिल ब्राह्मण महासंघातर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रावण महिन्याचे निमित्त साधून गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे . 25 जुलै ते 31 जुलै या कालावधीमध्ये हा पारायण सोहळा यशवंत दत्तात्रय देवस्थान शनिवार पेठ सातारा या ठिकाणी होणार आहे.या सात दिवसांच्या कालावधीमध्ये सकाळी साडेसात ते दुपारी 12 या कालावधीमध्ये गुरुचरित्राचे वाचन केले जाणार असून सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी आवश्यक आहे. हा पारायण सोहळा निशुल्क असून सर्व समाजातील दत्तभक्तांना पारायणात सहभागी होता येणार आहे.सर्व सहभागी दत्तभक्तांना गुरुचरित्राची पोथी भेट देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष धनंजय कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधावा नाव नोंदणीसाठी संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे. आहेत
धनंजय कुलकर्णी
94 22 60 35 45
अभय गोडबोले
98 81 19 60 34
प्रशांत आठवले
83 47 47 55 37
महेश कुलकर्णी
98 22 39 73 84

