संस्कार भारतीतर्फे मंगळवारी गीत रामायण
काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवानिमित्त कार्यक्रम
सातारा
येथील काळाराम मंदिरतर्फे दरवर्षी श्रीरामनवमी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी हा उत्सव 30 मार्च 6 एप्रिल या कालावधीत भक्तीमय वातावरणात साजरा केला जाणार आहे. या उत्सवात यावर्षी संस्कार भारतीच्या पश्चिम प्रांताच्या सातारा जिल्हा समितीतर्फे मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी गीत रामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.मंगळवार दिनांक 1 एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता काळाराम मंदिर येथे हा गीत रामायण कार्यक्रम होणार असून त्यामध्ये ज्येष्ठ शास्त्रीय गायक संजय दीक्षित यांचे शिष्य चंद्रकांत शिंदे,विभावरी गोडबोले आणि कल्याणी गायकवाड गीत रामायणातील गाणी सादर करणार आहेत. यावेळी त्यांना तबला साथ शांताराम दयाळ देणार असून सहवादक म्हणून प्रशांत दयाळ काम पाहणार आहेत.संवादिनीवर स्वरा किरपेकर साथ देणार आहे.या कार्यक्रमाचे निवेदन आणि संगीत संयोजन राजेंद्र आफळे करणार आहेत.प्रत्येकाच्या हृदयातील राम जागा करून त्याच्या गुणांचे व्यवहारात वर्तन नित्य व्हावे हाच या कार्यक्रमामागील उद्देश असून सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्कार भारतीच्या सातारा जिल्हा समितीने केले आहे.

