अमेरिकेच्या नासाने शोधली सुपर अर्थ
अमेरिकेच्या नासाने शोधली सुपर अर्थ
पृथ्वीपासून 137 प्रकाश वर्ष दूर आहे नवीन ग्रह
वॉशिंग्टन
अवकाशात आणि अंतराळात नेहमीच सतत काही ना काही गोष्टी घडत असतात आणि त्याचा शोध घेण्याचे काम विविध देशांच्या अवकाश संशोधन संस्था करत असतात त्यामध्ये अमेरिकेची नासा ही संस्था आघाडीवर आहे आता अमेरिकेच्या या संस्थेने एका सुपर अर्थचा शोध लावला असून या ग्रहावर मानवी जीवन अथवा जीवसृष्टी असण्याची शक्यता व्यक्त होत आहे
आपल्या पृथ्वीपासून 137 प्रकाश वर्ष इतके लांब हा ग्रह आहे हा ग्रह नेपच्यूनपेक्षा लहान आहे पण आपल्या पृथ्वीपेक्षा दीडपट रुंद आहे एका लाल ताऱ्याभोवती ही सुपर अर्थ परिभ्रमण करत असल्याचे नासाने म्हटले आहे या ताऱ्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास सुपर अर्थला 19 दिवस लागत आहेत म्हणजेच या सुपर अर्थवरील एक वर्ष पृथ्वीच्या हिशोबात 19 दिवसांचे ठरत ठरणार आहे या सुपर अर्थच्या पृष्ठभागावर पाणी असण्याची शक्यता ही नासाने व्यक्त केली आहे या सुपर अर्थच्या पृष्ठभागावर पाणी असल्यामुळेच या ठिकाणी जीवसृष्टी असल्याची आशा शास्त्रज्ञांना वाटत आहे याबाबत नजीकच्या कालावधीमध्ये अधिक संशोधन केले जाणार आहे
