विकसित व समृद्ध भारताच्या अमृत काळाची ब्ल्यू प्रिंट


जेष्ठ अर्थ विश्लेषक श्रीराम नानल यांचे प्रतिपादन

सातारा
केंद्रीय अर्थसंकल्प 2025 – 2026 हा आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभेत सादर केला. सलग आठव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या स्वातंत्र्योत्तर काळातील पहिल्याच अर्थमंत्री. यामध्ये त्यांनी विकसित आणि समृद्ध भारताच्या अमृत काळाची ब्ल्यू प्रिंट मांडलीआहे. यामध्ये कृषी, पायाभूत सुविधा, विकास, आरोग्य व शिक्षण यावर लक्ष केंद्रित करून सर्वसामान्य समाज घटकांचे जीवन अधिक सुसहय व आनंदी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न अर्थमंत्र्यांनी केला आहे असे प्रतिपादन जेष्ठ अर्थ विश्लेषक श्रीराम नानल यांनी केले आहे

Advertisement

नागरिकांना आता बारा लाख रुपयापर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही आयकर भरायला लागण्याची गरज नाही. त्यामुळे अतिरिक्त पैसा बाजारात येईल व अर्थव्यवस्थेला नवीन उभारी मिळेल. अर्थात चार लाखावरच्या उत्पन्नाला रिटर्न मात्र भरावा लागेल. ज्येष्ठ नागरिकांना एक लाखापर्यंतच्या वार्षिक व्याजाला टीडीएस लागणार नसून केवळ रिफंड घेण्यासाठी आता त्यांना रिटर्न भरावा लागणार नाही.
आरोग्य आघाडीवर भरीव योजना
आरोग्य आघाडीवर भरीव योजना आखण्यात आल्या असून सहा जीवन रक्षक औषधावरची ड्युटी कमी होणार आहे. तसेच वैद्यकीय पर्यटनाला सरकार उत्तेजन देणार असून प्रारंभी 200 जिल्ह्याच्या ठिकाणी डे केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. कॅन्सर साठीच्या औषधावरची जकात कमी झाल्याने ती अधिक स्वस्त होतील. मेडिकल उपकरणे सुद्धा कमी किमतीत लोकांना उपलब्ध होतील.
लघुउद्योग क्षेत्राला शासनाने मोठा दिलासा
मोबाईल फोन, मोबाईल बॅटरी, इलेक्ट्रिक कार तसेच एलईडी टीव्ही स्वस्त होतील.लघुउद्योग क्षेत्राला शासनाने मोठा दिलासा दिला असून एम एस ई एम ची गुंतवणूक आणि उलाढाल मर्यादा वाढवल्याने छोट्या उद्योगांच्या सवलती कायम राहतील.ग्रामीण आरोग्य केंद्रामध्ये.ब्रॉडबँड सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याने संपर्क सुलभ होईल.ग्रामीण भागामध्ये नळाने पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन मिशनची मुदत 2028 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
वस्तूंची डिलिव्हरी करणाऱ्या लोकांसाठी विशेष इन्शुरन्स योजना जाहीर झाली आहे. भारताला वैश्विक खेळणी विक्री केंद्र बनवण्याची योजना असून भारतीय खेळण्यासाठी सपोर्ट स्कीम जाहीर झाली आहे.दुग्ध आणि मत्स्य व्यवसायाला आता पाच लाखापर्यंतचे अर्थसहाय्य उपलब्ध होणार असून स्टार्टअप ची मर्यादा 20 कोटी पर्यंत वाढवण्यात आली आहे. या सर्व धोरणामुळे रोजगार क्षमतेत निश्चितच वाढ होणार आहे.पुढील पाच वर्षात वैद्यकीय शिक्षणाच्या सीटमध्ये 75 हजार संख्येने वाढ होणार आहे तर आयआयटीमध्ये 6500 सीट वाढवल्या जातील. कृत्रिम बुद्धिमत्तेवर संशोधन करण्यासाठी 500 कोटीची तरतूद केली आहे. अंगणवाड्या अधिक सक्षम करण्यासाठी तरतूद केली असून पोषण आहारही अधिक प्रथिने युक्त होण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध केला आहे.
सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विकास
एकंदरीत विकासाची दीर्घ योजना आणि अंमलबजावणीची सुनियोजित यंत्रणा असलेले सरकार सबका साथ, सबका विश्वास आणि सबका विकास हे आपले मूलभूत उद्दिष्ट गाठण्यासाठी सज्ज झाले आहे. आधुनिकतेची कास धरणाऱ्या आणि त्याचवेळी आपली सांस्कृतिक वैशिष्ट्ये जपणाऱ्या या देशांमधील सर्व घटकांच्या आशा आकांक्षा प्रतिबिंबित झालेला हा अर्थसंकल्प आहे. त्याबद्दल हे सरकार तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अभिनंदन पात्र आहेत.

श्रीराम नानाला यांचा फोन नंबर:9423034050
इमेल आयडी :shrirampp13@gmail.com


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!