वार्षिक राशिभविष्य  2025 : मेष रास


2025 च्या पोटात काय दडले असेल याची उत्सुकता सगळ्यांना असेल पुढील वर्षी शनी महाराज 29 मार्च 2025 रोजी कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करतील त्यामुळे मकर राशीची साडेसाती संपत असून मेष राशीची साडेसाती सुरू होईल 14 मे 2025 रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल तसेच 18 मे 2025 रोजी राहू आणि केतू यांचाही राशी बदल होईल राहू मीनेतून कुंभ राशीत प्रवेश करेल तर केतू कन्येतून सिंह राशीत प्रवेश करील वार्षिक भविष्य पाहताना वरील मुख्य ग्रहांचे राशी बदल आणि इतर सर्व ग्रहांचे गोचर पाहून राशिफल तयार होते

 मेष रास

वर्ष संमिश्र स्वरूपाचे

Advertisement

मेष राशीच्या व्यक्तींना 2025 हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे जाईल यावर्षी करिअर किंवा नोकरी रोजगार याबाबतीत अनेक चांगल्या संधी मिळू शकतात व्यवसाय किंवा व्यापार करणाऱ्या व्यक्तींना हे वर्ष फायदेशीर ठरू शकते व्यवसायात अनेक चांगले प्रस्ताव मिळू शकतील आरोग्य आणि वैवाहिक जीवन यामध्ये मात्र थोडे चढ-उतार पाहायला मिळतील वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यात सर्व कार्यात यश मिळेल परंतु मेष राशीला 29 मार्चपासून शनीची साडेसाती सुरू होत आहे 29 मार्च 2025 रोजी शनी मीन राशि प्रवेश करेल साडेसातीची सुरुवात असल्याने कौटुंबिक वादविवाद होऊ शकतात त्यामुळे मानसिक त्रास होऊ शकतो संपत्ती विवाद कौटुंबिक खटले कोर्ट केसेस इत्यादीमुळे खूप खर्च आणि मानसिक त्रास होईल याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो 14 मे रोजी गुरुचा मिथुन राशीत प्रवेश होईल त्यामुळे नोकरीत बदली होऊ शकते किंवा नोकरीत बदल होऊ शकतो स्थान बदल होऊ शकतो मानसिक तानाचा परिणाम मधुमेह किंवा थायरॉईड यांसारख्या आजार होऊ शकतात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मनासारखे यश मिळणार नाही शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना मनासारखी बदली किंवा पद मिळणार नाही मात्र परदेशात जाऊन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मनासारखे कॉलेज किंवा कोर्स मिळू शकेल ज्या विवाह इच्छुक तरुणांचा विवाह ठरला आहे त्यांनी वर्षाच्या सुरुवातीलाच विवाह करून घ्यावा कारण त्यानंतर विवाहात अनेक अडथळे येऊ शकतात 30 मे 2025 रोजी राहू आणि केतूचे गोचर कुंभ आणि सिंह राशीत होईल मेष राशीच्या गर्भवती महिलांनी या काळात काळजी घ्यावी परदेशात नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना चांगली ऑफर मिळेल व्यापारात थोडे चढ-उतार पाहायला मिळतील व्यापारात जास्त गुंतवणूक करूनही फारसा फायदा होणार नाही साडेसातीमुळे एखादा असाध्य रोग होऊ शकतो प्रेम संबंधातही तू तू मैंने चालू राहील तुमच्या केतू तुमच्या पंचमस्थानातून गोचर करीत असल्याने प्रेमिकांमध्ये संबंध ताणले जातील राहूचे लाभभावातील गोचर मुळे चांगले आर्थिक लाभ होतील नोकरदारांना पगार वाढ तर व्यवसाय चांगला नफा मिळेल शेअर मार्केट मधूनही चांगला फायदा होऊ शकतो मेष राशीच्या व्यक्तींसाठी जानेवारी एप्रिल ऑगस्ट आणि नोव्हेंबर हे महिने काहीसे आव्हानात्मक राहतील


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!