शाश्वत विकासासाठी ग्रिन बिझनेस राष्ट्रीय परिषद
२७,२८ रोजी विविध विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन
सातारा
रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च वर्षे सातारा व शिवाजी युनिव्हर्सिटी मॅनेजमेंट टीचर असोसिएशन सुमटा यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवशीय राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. या परिषदेमध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठीचा दृष्टीकोन – ग्रीन बिझनेस या विषयावर तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. परिषदेचे उद्घाटन शुक्रवार 27 सप्टेंबर रोजी कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ ज्ञानदेव मस्के यांच्या हस्ते होणार आहे. शिवाजी विद्यापीठाच्या कॉमर्स अँड मॅनेजमेंट अधिष्ठाता डॉ एस एस महाजन हे बीज भाषण करणार आहेत कार्यशाळेमध्ये प्रोफेसर डॉ एम आर पाटील गोवा व डॉ पी एम कुलकर्णी बेळगाव , डॉ एस बालाजी मद्रास हे मार्गदर्शन करणार आहेत मान्यवरांच्या हस्ते परिषदेचे प्रोसिडिंग अलाईव्हचे प्रकाशन होईल
कार्यशाळेच्या दुसऱ्या दिवशी 28 सप्टेंबर 2024 रोजी संशोधक, मार्गदर्शन, विद्यार्थी यांच्या संशोधनाचे प्रदर्शन होणार आहे. या राष्ट्रीय परिषदेचा सांगता समारंभास प्रमुख वक्ते डॉ राजेंद्र सरकाळे सीईओ सातारा सेंट्रल को-ऑपरेटिव्ह बँक सातारा उवस्थित राहणार आहेत. या परिषदेसाठी राज्यातून व देशभरातून १५० तज्ञ मार्गदर्शक व संशोधक उपस्थित राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील इच्छुक उद्योजक व संशोधक यांनी या राष्ट्रीय परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन इन्स्टिट्युटचे संचालक डॉ बी एस सावंत यांनी केले आहे.

