मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार
८ ऑक्टोबर रोजी होणार प्रदान कार्यक्रम
नवी दिल्ली
भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल सुप्रसिद्ध कलाकार मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.आपल्या कसदार अभिनयाने त्यांनी रसिकांवर भुरळ घातली, रसिकांच्या दिलाची धडकन म्हणून त्या काळी मिथून चक्रवर्तींना ओळखलं जातं होतं. त्यांच्या अभिनयाचा सन्मान म्हणुन हा मोठा पुरस्कार त्यांना घोषित झाला आहे.
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ट्विटरवर यासंदर्भात माहिती दिली असून त्यांनी आपल्या पोस्टमध्ये मिथून चक्रवर्तींबद्दल गौरौद्गार केले आहे. खुद्द अश्विनी वैष्णव यांनी पोस्ट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी लिहिले, “मिथुन दा यांचा गौरवशाली चित्रपट प्रवास पिढ्यांना प्रेरणा देतो! हे जाहीर करताना अभिमान वाटतो की दादासाहेब फाळके निवड ज्युरीने श्री मिथुन चक्रवर्ती जी यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे”
8 ऑक्टोबर 2024 रोजी होणाऱ्या 70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार मिथून दादांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहितीही अश्विनी यांनी दिली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्यानंतर काही महिन्यांनी दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याची बातमी आली आहे. एप्रिलमध्ये हा समारंभ झाला होता आणि त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून सन्मान मिळाला.
मिथुन चक्रवर्ती यांनी 1977 मध्ये त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली आणि ते त्यांच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार जिंकणाऱ्या काही अभिनेत्यांपैकी एक बनले. या अभिनेत्याने आपला प्रवास “मृगया” मधून सुरु केला आणि 1982 मध्ये प्रदर्शित झालेल्या “डिस्को डान्सर” चित्रपटानंतर ते प्रसिद्ध झाले. यानंतर त्यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपट दिले.
मिथुन चक्रवर्ती यांना ‘मिथून दा अशा नावाने देखील ओळखले जाते. (जन्म 16 जून 1952 रोजी झाला. त्यांचे मुळ नाव गौरांग चक्रवर्ती असे आहे. भारतीय अभिनेता, गायक, चित्रपट निर्माता, लेखक आहेत. त्यांना दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार तर तीन वेळा फिल्मफेर पुरस्कार मिळाला आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाकडून ते राज्य सभेवर सदस्य देखील होते. मृगया (1976) हा त्यांचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. तर आज त्यांना दादासाहेब फाळके या पुरस्कार जाहीर झाला असून मिथून दा यांनी आनंदी असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
मिथुन दा यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात ‘मृगया’ या चित्रपटातून केली ज्यासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्याने मल्टीस्टारर चित्रपटांमध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडली पण ‘डिस्को डान्सर’ या चित्रपटाने त्याला स्टार बनवले. त्यांनी जवळजवळ प्रत्येक शैलीतील चित्रपटांमध्ये काम केले