पुण्यात शिरच्छेद केलेला तरुणीचा मृतदेह
मुळा-मुठा नदीपात्रात सापडला मृतदेह
पुणे
पुण्यातील खराडी भागात मुळा-मुठा नदीपात्रात शिरच्छेद केलेला एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे.अतिशय क्रूर पद्धतीने हत्या करुन मृतदेह नदीपात्रात फेकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात सापडलेल्या मृतदेहाचे डोके, हात, पाय धडापासून वेगळे करुन मृतदेह फेकून देण्यात आला आहे. प्राथमिक माहितीनुसार मृत तरुणीचे वय 18 ते 20 वर्षांच्या दरम्यान असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरु केला.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, तरुणीची हत्या करण्यात आली असावी, त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यात आले आणि नदीपात्रात धड फेकण्यात आले. तरुणीचे हात, पाय, डोके धडापासून वेगळे करण्यात आले. यासाठी धारदार शस्त्राचा वापर केला असण्याची शक्यता आहे. डोकं नसलेलं धड पोलिसांना नदी पात्रात सापडलं. त्यामुळे मृत तरुणीची ओळख पटवणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. चंदननगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.आरोपीने क्रोर्याच्या सर्व सीमा पार केल्याचे या घटनेतून समोर आले आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने आणि शांत डोक्याने ही हत्या केली असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली. मृत तरुणीची ओळख पटवता येऊ नये यासाठीच हात, पाय आणि डोकं धडापासून वेगळं केलं असण्याची शक्यता आहे. त्यासाठी धारदार शस्त्राचा वापर केला असला पाहिजे, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. चंदननगर पोलिस या घटनेचा तपास करत आहेत
