जुनी हिंदी गाणी ऐकल्याने ऊर्जा मिळते : स्मिता कोरपे


सातारा
जुनी हिंदी गाणी ऐकल्याने एक प्रकारची ऊर्जा मिळते व मन प्रसन्न राहते असे प्रतिपादन स्मिता कोरपे यांनी दीपलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था आयोजित
महेश बुटे व रियाज ग्रुप सातारा प्रस्तुत संगीतकार आर.डी.बर्मन यांच्या सदाबहार गीतांच्या मैफिलीच्या उद्घाटनाच्या वेळी केले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून स्मिता कोरपे, सुरेखा शेजवळ, अनिल वाळिंबे, राजेश कोरपे,हेमंत कासार, शिरीष चिटणीस उपस्थित होते.
या गीत मैफिलीमध्ये किरण अडागळे,आरती वाणी, धनश्री बागडे,श्रीपाद जोशी, जलील शेख,अरुण कुलकर्णी, महेश बुटे, श्रीमती प्रमिला बुटे,लियाकत शेख या गायक कलाकारानी आपली सुमधुर गीते रसिक श्रोत्यांसाठी सादर केली.
स्मिता कोरपे म्हणाल्या जुनी हिंदी गाणी ऐकल्यामुळे मनाला एक प्रकारची ऊर्जा मिळते. तसेच दैनंदिन ताण-तणाव कमी होऊन
मन प्रसन्न राहते. व हे सर्व कराओकेचे कार्यक्रम ऐकल्यामुळे जाणवते.

शिरीष चिटणीस म्हणाले सध्या देशामध्ये कराओके चे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर रसिक श्रोत्यांसाठी होत असून त्यातून समाजाला प्रेरणा व दिशा देण्याचे काम अविरत चालू आहे. संगीत जीवनाचा अविभाज्य घटक आहे.जुनी हिंदी गाणी ऐकल्यामुळे मन प्रसन्न होते व एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा मिळते
या कार्यक्रमासाठी आलेल्या नवीन गायकांचे त्यांनी स्वागत करून प्रोत्साहन दिले. व आपणही या व्यासपीठाचा उपयोग करून
गाण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करावे असे आवाहन केले.

Advertisement

संगीतकार आर.डी.बर्मन यांच्या सदाबहार गीतांच्या महफिलीची सुरुवात दीपप्रजनन करून झाली असून या गीत मैफिल मध्ये प्रेम गीत, विरह गीत, सोलो गीत, डुएट गीत फर्माईश इत्यादी गीत प्रकारांचा समावेश करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात
किरण अडागळे यांच्या ” देखा ना हाय रे सोचा ना हाय रे ” या सदाबहार गीताने झाली. यानंतर महेश बुटे यांनी
“डोली मे बेठाई के कहार “यानंतर शिरीष चिटणीस यांनी ” मेरी भीगी भीगी सी पलको मे रहके ” हे सदाबहार गीत गायले आरती वाणी यांनी “दम मरो दम”, “आओ ना गले लगा लो ना”, “पिया तू अब तो आजा”,” रैना बीती जाये ही गाणी गायली” जलील शेख “मुसाफिर हुं यारो” आणि “आनेवाला पल जानेवाला” ही गाणी गायली डॉ. लियाकत शेख यांनी “सुहानी चांदनी राते” आणि तुमने मुझे देखा अरुण कुलकर्णी यांनी ” दिवाना लेके आया है” ” जिंदगी के सफर मे” ” मै शायर बदनाम” धनश्री बागडे यांनी तुने ओ रंगीले कैसा जादू किया ” श्रीमती प्रमिला बुटे यांनी ” बलमा माने ना” श्रीपाद कुलकर्णी यांनी आपकी आंखो मे कुछ ” “रिमझिम गिरे सावन” “भिगी भिगी रातो मे हि गीते सादर केली

या कार्यक्रमाचा शेवट महेश बुटे यांच्या ” चिंगारी कोई भडके ” या अप्रतिम गीताने झाला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!