गायक यश कोल्हापुरेला भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती


महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून शाबासकी

सातारा
सातारचा युवा गायक यश सारंग कोल्हापुरे याला महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाकडून दिली जाणारी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती मिळाली.दरमहा पाच हजार रुपये या प्रमाणे दोन वर्षे ही शिष्य वृत्ती देण्यात येणार आहे. या शिष्यवृत्ती निवड चाचणीसाठी परीक्षक म्हणून ज्येष्ठ गायिका सौ.अश्विनी भिडे देशपांडे,पंडित अजय पोहनकर,सौ.प्रज्ञा देशपांडे,उस्ताद उस्मान खान यांनी काम पाहिले.
यशला आजी डॉ.सौ.संगीता कोल्हापुरे यांच्याकडे शास्त्रीय संगीताची तालीम मिळाली.पंडित उल्हास कशाळकर,पंडित मोहन दरेकर,पंडित हेमंत पेंडसे यांनीही संगीताचे धडे दिले.

Advertisement

अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या संगीत अलंकार परीक्षेत तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला. भारती विद्यापीठ,पुणे गायन विषयात प्रथम श्रेणी त्याने मिळवली.सध्या अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या पी एच डी.म्हणजे संगीताचायर्य या परीक्षेचा अभ्यास तो करतो आहे.त्याला यापूर्वीही भारत सरकार, आवर्तन गुरुकुल,पुणे यांची शिष्यवृत्ती मिळाली आहे.पंडित राम माटे पुरस्कार त्याला मिळाला असून मुंबई, पुणे,मिरज,सातारा, बेळगांव, इचलकरंजी अशा विविध ठिकाणच्या संगीत मैफिलीत त्याने शास्त्रीय गायन करून रसिकांची दाद मिळवली आहे. पूर्ण वेळ शास्त्रीय संगीत मैफिलीचा कलाकार म्हणूनच त्याला कारकीर्द घडवायची आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!