11 ऑगस्टला सज्जनगड रन २०२४
साताऱ्यातील मॅरेथॉनपटू नागरिकांसाठी संधी
सातारा
साताऱ्यातील मॅरेथॉनपटू नागरिकांसाठी सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळ आणि शाहूपुरीतील दिवेकर हॉस्पिटल र यांच्या संयुक्त विद्यमाने ११ ऑगस्टला सज्जनगड रन २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.
या रनबद्दल माहिती देताना समर्थभक्त डॉ. अच्युत गोडबोले म्हणाले, “श्री समर्थ रामदास स्वामींच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करण्याबरोबरच नागरिकांना आरोग्याचा मंत्र द्यावा, यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गजवडी (ता. सातारा) अभयसिंहराजे हायस्कूलपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेचा समारोप सज्जनगड येथे श्री समर्थ सेवा मंडळाच्या कार्यालयानजीक होईल.
१८ वर्षांवरील पुरूष व महिलांसाठी असलेल्या या पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत संपूर्ण धावणमार्ग हा चढाचा असल्याने धावपटूंचा निश्चित कस लागेल; परंतु गडावरील पायऱ्या चढताना निसर्गरम्य परिसरामुळे धावपटूंना आनंद तर मिळेलच; पण त्यांच्यातील ऊर्जा समर्थ रामदासस्वामींनी महत्त्व पटवून देण्यासाठी साताऱ्यास राज्यात मारुती मंदिरांची स्थापना केली. सज्जनगड रन २०२४ च्या आयोजनाचा हेतू देखील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे हाच आहे
या स्पर्धेत इच्छुकांसाठी सशुल्क प्रवेश दिला जाणार आहे. इच्छुक धावपटूंनी पंचपाळी हौदानजीकच्या समर्थ सदन येथे संपर्क साधावा, असे आवाहन योगेशबुवा रामदासी यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी नावनोंदणी करणाऱ्यांना स्पर्धेपूर्वी टी शर्ट, टी बॅच तसेच स्पर्धा पूर्ण झाल्यावर पट ऑनलाइन सर्टिफिकेट, रामवस्त्र, (अल्पोपाहार) दिला जाणार आहे, माहिती प्रवीण कुलकर्णी यांनी दिली
