श्री सिद्धनाथ नागरी पतसंस्थेच्या संचालकपदी सौ. सोनिया जयकुमार गोरे
सिद्धनाथ पतसंस्था संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये निर्णय
सातारा
संपूर्ण महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या श्री सिद्धनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित दहिवडीच्या संचालक मंडळाच्या मासिक मीटिंग मध्ये संस्थेच्या स्विकृत संचालिका पदी सौ. सोनिया जयकुमार गोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री सिद्धनाथ पतसंस्थेचे चेअरमन अरुण (आबा) गोरे, व्हा.चेअरमन बाबासाहेब (मामुशेठ) वीरकर , संचालक अर्जुन (तात्या) काळे , विजय जाधव , महादेव कदम ,बापू जाधव , राजेंद्र जाधव , नारायण वीरकर , दत्तात्रय देशमाने , चंद्रकांत जगदाळे , नंदाबाई दडस , पुनम पोळ ,जयवंत रोकडे , संजय काका गांधी , आणी सरव्यवस्थापक रणजित पोळ , उपव्यवस्थापक श्री.गोंजारी सर यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
