रोहित शर्माला अश्रू अनावर


इतर खेळाडूंचे लक्ष नसताना विराटने सावरले
मुंबई
टी-२० वर्ल्डकप २०२४मधील जर कोणत्या संघाने लागोपाठ चांगली कामगिरी केली असेल तर तो संघ म्हणजे भारत. वर्ल्डकप सुरु झाल्यापासून टीम इंडिया सतत चांगले प्रदर्शन करून अखेर फायनलमध्ये पोहोचली. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडियाने चक्क १० वर्षानंतर फायनलची फेरी गाठली आहे.भारतीय संघाने इंग्लंडविरुद्ध सेमीफायनल फेरी जिंकल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा भावूक होऊन रडताना दिसला. सेमीफायनल फेरीचा सामना संपल्यानंतर खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परत जात असताना रोहित ड्रेसिंग रूमच्या दरवाजजवळ असेलल्या खुर्चीवर बसला इतर खेळाडू मस्ती करताना दिसले तर कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे शांत दिसला. ड्रेसिंग रूमच्या दरवाजाजवळ बसून रोहित डोळे पुसताना दिसला यावेळी विराटने रोहितला शांत करायचा प्रयत्न केला आणि रोहितच्या चेहऱ्यावर हास्य यावे असे प्रयत्न तो करू लागला.
२०२२ मध्ये इंग्लंडविरुद्ध भारताचा १० विकेट्सनी पराभव झाल्यानंतर रोहित असाच रडताना दिसला होता तेव्हाही रोहित ॲडलेड ओव्हलच्या ड्रेसिंग रूमच्या बाहेर खुर्चीवर बसला होता. फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने सोप्या विकेटवर इंग्लंडला केवळ १६९ धावांचे लक्ष्य दिले होते.२०२२ मध्येही जोस बटलर संघाचा कर्णधार होता आणि ॲलेक्स हेल्सच्या साथीने भारताला चार षटके शिल्लक असताना पराभूत करून वर्ल्डकपमधून बाहेर काढले होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!