भारताविरोधातील ‘बकवास’ आता संपली पाहिजे’


ब्रिटनच्या नामांकित वृत्तपत्राच्या सहायक संपादकाचे मत, जाणून

Advertisement

लंडन
भारतात सध्या लोकशाहीचा उत्सव साजरा होत आहे. भारतामधील या निवडणुकीकडे अवघ्या जगाचे लक्ष आहे. विविध प्रसारमाध्यमं जास्तीत जास्ती सखोल वार्तांकन करण्यासाठी प्रयत्नशील दिसत आहेत. भारतातील निवडणुकीचे कव्हरेज करण्यासाठी ब्रिटनहून आलेल्या एका नामांकीत वृत्तपत्राच्या सहायक संपादकांनी भारताविरोधातील ‘बकवास’ आता संपली पाहिजे’ अशा शब्दात भारताबाबतचे मत मांडले आहे.
युनायटेड किंगडमचे वृत्तपत्र डेली एक्स्प्रेसचे सहायक संपादक सॅम स्टीव्हन्स म्हणतात, मला वाटतं की आता वेळ आली आहे की, भारतावरील टीका खूप झाली. भारतविरोधीतील ‘बकवास’ संपली पाहीजे. आपल्याला येथे येऊन नव्या भारताच्या खरी, सकारात्मक गोष्टी ऐकयाला पाहिजेत. दुर्दैवाने, लंडन आणि संपूर्ण युरोपात पसरलेल्या अनेक गोष्टी भारताबाबत नकारात्मकतेतून आहेत.आम्ही येथील धार्मिक विभाजनाबाबत ऐकतो. परंतु वस्तूस्थिती अजिबात अशी दिसली नाही. आम्ही नरेंद्र मोदींच्या सभेला बुरखा परिधान केलेल्या मुस्लीम महिलांना सुद्धा बघितलं आहे.
आम्ही या महान आणि अद्भूत राष्ट्राच्या बहुलवादाचे उदाहरण बघितले आहे. आम्ही या राष्ट्राबाबत ब्रिटिश मीडियाचे कव्हरेज उत्कृष्ट बनवण्यासाठी येथे आलो आहोत. आम्ही सत्य जाणून घेण्यास आणि काही वास्तवादी तथ्य शोधण्यास व ते लंडनला घेऊन जाण्यास इथे आलो आहोत,असेही त्यांनी म्हटले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!