प्लेऑफमध्ये चौथा संघ कोणता
शनिवारच्या सामन्यात होणार निर्णय
मुंबई
आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमध्ये तीन टीम्स निश्चित झाल्या आहेत. कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायजर्स हैदराबाद. आता फक्त चौथी टीम कुठली याचा निर्णय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्या सामन्यानंतर होईल शनिवारी 18 मे रोजी बंगळुरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा ब्लॉकबस्टर सामना रंगणार आहे. यात भारतीय क्रिकेटमधील दोन मोठे सुपरस्टार एमएस धोनी आणि विराट कोहली आमने-सामने असतील. दोघेही मैदानावर काय कमाल दाखवतात, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. सध्या हे दोन्ही दिग्गज खेळाडू वेगळ्याच तयारीत आहेत.
बंगळुरुमध्ये होणाऱ्या या सामन्याती सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत आहेत. एकाबाजूला बंगळुरु आहे. 8 पैकी 7 सामने हरल्यानंतर या टीमने उसळी घेतली. सलग 5 सामने बंगळुरुने जिंकले. ते प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम आहेत. दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा सीजन चढ-उतारांनी भरलेला आहे. ते सुद्धा अजून शर्यतीत टिकून आहेत. एकाबाजूला विराट कोहली आहे, ज्याने त्याच्यावर उपस्थित होणारे सर्व प्रश्न, टीकेला आपल्या बॅटने उत्तर दिलय. दुसऱ्याबाजूला धोनी आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांना खूश करतोय. हे दोन्ही दिग्गज आपल्या टीमला जिंकवून प्लेऑफमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करतील.
