फडणवीस दिल्लीला जाणार होते


आदित्यला मुख्यमंत्रीपदासाठी ग्रूम करणार होते,उद्धव ठाकरेंचा दावा
मुंबई
देवेंद्र फडणवीस आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार होते, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदासाठी मार्गदर्शन करणार आणि नंतर मी राष्ट्रीय राजकारणात जाणार असं फडणवीस म्हणाल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत केला आहे.भाजपनं मला माझ्याचं लोकांसमोर खोटं पाडलं असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे अडीच-अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रिपदाचं आश्वासन मला स्वतः अमित शाहांनी दिलं होतं याचा पुनरुच्चार देखील उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपनं कोणतंही काम केलेलं नाही आणि फक्त प्रश्रू श्रीरामाचं नाव घेऊन मतं मागितली आहेत. मी काल एक यूट्यूब व्हिडीओ पाहिला, ज्यामध्ये एका शेतकऱ्याला विचारले गेले की, त्याला पीएम किसान सन्मान निधी योजनेचे 6000 रुपये मिळाले आहेत का? तर शेतकरी म्हणाला की,मला सरकारकडून 6000 रुपये मिळाले आहेत, पण मी एका वर्षात खतासाठी 1 लाख रुपये आणि 18 टक्के, 18,000 रुपये जीएसटी देतो. त्यामुळे सरकारचे माझ्याकडे 12,000 रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे या निवडणूकीत भाजपचा पराभव होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!