बारामतीत शरद पवार रिंगणात


पण हे शरद पवार ते शरद पवार नाहीत
पुणे
बारामती लोकसभा मतदार संघात रिक्षावाला संघटनेकडून एक उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. या उमेदवाराचे नाव शरद पवार आहे. पण हे शरद पवार म्हणजे “शरद राम पवार” आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष असलेले शरद गोविंदराव पवार नाहीत. परंतु नावात साधर्म्य असल्यामुळे चर्चा रंगली आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीकडे देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पवार घराण्यातील दोघांमध्ये दुरंगी लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात ही लढत आहे. त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडणूक लढवत आहेत.दोघांचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. यावेळी बारामती लोकसभा मतदार संघासाठी शरद राम पवार यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांना
बारामती लोकसभा मतदारसंघातून रिक्षावाला संघटनेने उमेदवारी दिली आहे. शरद पवार यांच्यासारखे नाव असल्याने राजकीय वर्तुळात शरद राम पवार यांच्या उमेदवारीची चर्चा रंगलीआहे. शरद राम पवार हे स्वतः रिक्षाचालक असून गेल्या अनेक वर्षापासून पुण्यातील आंबेगाव बुद्रुकमध्ये वास्तव्यास आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!