रामलल्लावर सूर्य अभिषेक
रामनवमीला होणार सोहळा ,चाचणी यशस्वी
अयोध्या
22 जानेवारी 2024 ला अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा झाली. त्यामुळे यंदा अयोध्येत रामनवमीला दिवाळीचं वातावरण असणार आहे. रामनवमीला श्रीरामाच्या मूर्तीच्या कपाळावर सूर्यभिषेक करण्यात येणार आहे. रामनवमीला हा सोहळा होणार असून सूर्याभिषेकची यशस्वी चाचणी करण्यात आली.
The event of Surya Abhishek, where Surya (the Sun) applies tilak on the forehead of Ram Lalla (the infant Lord Ram), was successfully tested in the premises of Ramlala in Ayodhya. On April 17, 2024, during the Ram Navami festivities. pic.twitter.com/ijJ555mQQj
— aadyayaya (@aadyamaybe) April 14, 2024
रामनवमीला अयोध्येत राम मंदिरात 17 एप्रिलला दुपारी 12.16 मिनिटांनी 5 मिनिटांसाठी रामलल्लाच्या कपाळावर सूर्याची किरणे तिलक स्वरुपात लावण्यात येणार आहे. या सोहळ्याबद्दल मिळालेल्या माहितीनुसार तीन आरशांच्या माध्यमातून सूर्याची किरणे वेगवेगळ्या कोनातून वळवली जाणार आहे. त्यानंतर ते ब्रास पाईप्सद्वारे पुढे करण्यात येणार आहे.
रामचरित्रमानसनुसार रामनवमीच्या दिवशी दुपारी रामाचा जन्म हा दुपारी झाला होता. अयोध्येतील राम मंदिरात दिसणारा नजारा खूप सुंदर असणार आहे, त्यामुळे मोठ्या संख्येने भक्त अयोध्येत दाखल झाले आहे. या मंदिराची रचना मूर्तीवर सूर्यभिषेक करताना येईल याप्रकारे बांधकामाच्या वेळी करण्यात आली आहे. याच सोहळ्याचा भाग कदाचित शास्त्रज्ञांनुसार मूर्तीची उंची आणि लांबी ठरवण्यात आली आहे. राम मंदिर पूजारांनी सांगितलं की, दरवर्षी रामनवमीला रामलल्ला यांच्यावर सूर्यभिषेक करण्यात येणार आहे.
