छत्तीसगडमध्ये 18 नक्षलवादी ठार
मोठी चकमक, 3 जवान जखमी
रायपूर
छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार गोळीबार झाला. या चकमकीत पोलिसांनी 18 नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. त्याचबरोबर तीन जवानही जखमी झाले आहेत.कांकेर जिल्ह्यातील छोटाबेठिया पोलिस स्टेशन हद्दीतील जंगलात मंगळवारी पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये अचानक गोळीबार सुरू झाला. या चकमकीत सुरक्षा दल पोलिसांनी 18 नक्षलवाद्यांना ठार केले. सर्व नक्षलवाद्यांचे मृतदेहही ताब्यात घेण्यात आले आहेत.
सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांकडून सात एके 47, 3 एलएमजी रायफल जप्त केल्या आहेत. आयजी बस्तर पी. सुंदरराज यांनी सांगितले की, या चकमकीत तीन जवान जखमी झाले आहेत. या चकमकीत किती नक्षलवादी मारले गेले याबाबत अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
कांकेर ही छत्तीसगडमधील लोकसभेची जागा आहे, ज्यामध्ये विधानसभेच्या 6 जागा आहेत. हा जिल्हा रायपूर आणि जगदलपूरच्या मध्ये येतो. कांकेर जिल्हा गेल्या काही वर्षांपासून नक्षलवादी हिंसाचाराने त्रस्त आहे. कांकेर लोकसभा जागेसाठी दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. यापूर्वी या लोकसभा मतदारसंघात नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आहे 3 जवान जखमी
Tuesday, 16 Apr, 6.55 pm
