कर्मचाऱ्यांसाठी १० दिवसांची ‘दुःखी रजा’


आनंदी नसताना कामावर येण्याची गरज नाही
बीजिंग
काम करायची इच्छा नसताना काम करावेच लागते दुःखात असतानाही कर्तव्य बजावावे लागते पण आता कर्मचाऱ्यांच्या या समस्येवर चीनच्या एका कंपनीने तोडगा काढला आहे कर्मचाऱ्यांसाठी १० दिवसांची ‘दुःखी रजा’ योजना राबवण्यात येणार असून आनंदी नसताना कामावर येण्याची गरज नाही

Advertisement

पँग डुंग लाय या कंपनीचे संस्थापक आणि अध्यक्ष- यु डुंग लाय यांनी अलीकडेच आपल्या कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी १० दिवसांची ‘दुःखी रजा’ जाहीर केली आहे. वर्षभरात या १० सुट्ट्यांसाठी कर्मचारी अर्ज करू शकतात. “प्रत्येक वेळी प्रत्येक जण आनंदी असेलच असे नाही. त्यामुळे आनंद नसताना कामावर येण्याची गरज नाही, उलट यावेळी तुम्ही आराम करायला हवा तुम्हाला आनंद मिळेल अशा गोष्टी करायला हव्यात” असं म्हणत ‘दुःखी रजा’ किंवा ‘नाखूष रजा’ या संकल्पनेची घोषणा केल्याचे समजतेय. विशेष म्हणजे या रजा कंपनीच्या व्यवस्थापनाद्वारे नाकारल्या जाणार नाहीत याचीही हमी यांनी दिली आहे.
याच कंपनीने यापूर्वी नोकरीसाठी एक प्रमाणपत्र प्रणाली सुद्धा तयार केली होती. याची घोषणा करताना यु डुंग लाय म्हणाले होते की, “कंपनीतील स्वच्छता कर्मचारी सुद्धा त्याच्या कामाच्या क्षमतेनुसार वर्षाला साधारण ५ लाख युआन म्हणजेच (७० हजार अमेरिकन डॉलर्स) कमावू शकतो.”
दरम्यान, ही ‘दुःखी रजेची’ घोषणा होताच सोशल मीडियावर नेटकरी या कंपनीचं तोंडभरून कौतुक करत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!