जगाने पाहिले खग्रास सूर्यग्रहण
वॉशिंग्टन
सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र आला की त्या घटनेला सूर्यग्रहण म्हटलं जातं.मेक्सिको, अमेरिका आणि कॅनडामधल्या लाखो लोकांनी सोमवारी सूर्यग्रहणाचा अनुभव घेतला.

पृथ्वीचा तीन चतुर्थांश भाग महासागरांनी भरलेला आहे, त्यामुळे जमिनीवर संपूर्ण सूर्यग्रहण पाहणे अत्यंत दुर्मिळ मानलं जातं.
Advertisement

या सूर्यग्रहणाची पहिली सावली प्रशांत महासागरात पडली आणि तिथून तिने मेक्सिकोपर्यंतचा प्रवास केला. या ग्रहणामुळे हजारो लोकांच्या डोळ्यादेखत दिवसाचा प्रकाश काळोखात परावर्तित झाला.अमेरिकेतून दिसणारं हे ग्रहण पाहायला जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक पोहोचले होते.
