पोलिसांकडून दाम्पत्याला महाबळेश्वरचे पॅकेज


पती-पत्नीतील वाद सोडवत केले समुपदेशन

पुणे
आधुनिक काळात वैवाहिक जीवनात गैरसमज होण्याचे प्रमाण वाढले आहे आणि लगेच घटस्फोटाचा मार्गहि चोखाळला जात आहे पण अशाच एका दाम्पत्याचे समुपदेशन करून त्यांचा संसार रुळावर आणण्याचे काम पोलिसांनी केले असून भांडण मिटलेल्या या दाम्पत्याला पोलिसानी महाबळेश्वर सहलीचे पॅकेजहि दिले
हि घटना पुण्यातील आहे दाम्पत्यापैकी ‘ती’ उच्चशिक्षित असल्याने चांगल्या नोकरीला, पगारही गलेलठ्ठ. सहाच महिन्यांपूर्वी तिने अरेंज मॅरेज केले. पण लग्नानन्तर जोडीदाराने तू तुझ्या आई-वडिलांना एकही रुपया द्यायचा नाही असे म्हणत मारहाण अन् शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. काही दिवस तिने हा त्रास सहनही केला. पण, त्रास वाढू लागल्याने ती थेट सिंहगड रोड पोलिस ठाण्यात पोहोचली. पोलिसांनी देखील कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता तिच्या आई-वडिलांची भूमिका निभवत तिच्या संसाराचा गाडा पुन्हा रुळावर आणला

Advertisement

ती लग्नाच्या आधीपासूनच आई-वडिलांवर असलेला कर्जाचा ताण हलका करण्यासाठी त्यांना दरमहा काही पैसे देत आहे. तिचे लग्नाचे वय झाल्याने वडिलांनीच तिला लग्न करण्याबाबत सुचवलं. तिनेही वडिलांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न केले. लग्नानन्तर पत्नी तिच्या आई -वडिलांना दरमहा २० हजार रुपये देत असल्याचे दिसले. त्यामुळे तो चिडला. त्याने आई-वडिलांना पैसे द्यायचे नाही म्हणत वाद घालण्यास सुरूवात केली. याच कारणावरून पत्नीला मारहाण व शिवीगाळदेखील केली. सासू-सासऱ्यांपर्यंत हा विषय गेल्यावर त्यांनी दोघांनाही समजावून सांगून पुन्हा वाद न करण्यास सांगितले. काही दिवस वाद मिटला. मात्र, पुन्हा पतीने पैशांवरून वाद घालण्यास सुरुवात केली. दररोजचा वाद विकोपाला जाऊ लागला. या त्रासाला कंटाळून शेवटी तिने थेट सिंहगड रोड पोलिस ठाणे गाठले आणि पोलिसांना होणाऱ्या त्रासाची माहिती दिली.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभार व उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून या मुलीचे आई-वडिल होत तिची पूर्ण कहाणी ऐकली. तिला धीर देत पतीला सायंकाळी पोलिस चौकीत बोलवून घेतले. विजय कुंभार यांनी स्वत: चौकीत जात या दोघांना समोरासमोर बसवले आणि त्यांना विचारपूस केली. दोघांचे ऐकल्यानंतर त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.पतीला पोलिसांनी मार्गदर्शन आणि चुकत असलेल्या गोष्टी लक्षात आणून दिल्या. त्याला या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर त्याने माफी मागितली अन् पुन्हा असं करणार नाही, याची हमीही दिली. योगायोग त्याचा वाढदिवसदेखील त्याच दिवशी होता. हे वरिष्ठ निरीक्षक कुंभार यांना कळताच त्यांनी पोलिस चौकीतच केक कापून त्याचा वाढदिवस सर्वांसोबत साजरा केला.तिने त्याचा वाढदिवस असल्याने त्याला गिफ्ट घेतले होते. त्यामुळे दोघांमधील वाद मिटवून पोलिसांनि त्यांना वाढदिवसाचा केक कापायला लावला. एकमेकांना केक भरवून त्यांच्या वादाचा शेवट गोड केला.

नवीन संसार असल्याने वाद होत असतात; पण यातून मारहाण करणे चुकीचे आहे. दोघांनाही त्यांच्या चुका लक्षात आणून देत त्यांना पुन्हा नव्याने संसार करण्यास सांगितले आहे.असे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कुंभारयांनी म्हटले आहे
या प्रकरणात दोघेही उच्चशिक्षित असून, त्यांचे आई-वडीलदेखील सुशिक्षित आहेत. त्यांची समजूत घातली असून, एकमेकांना वेळ मिळावा, यासाठी आमच्याकडून त्यांना महाबळेश्वर सहलीचे पॅकेज दिले जाणार आहे अशी माहिती सिंहगड पोलिस ठाणे पोलिस उपनिरीक्षक सुरेश जायभाय यांनी दिली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!