या गावात पाळले जातात साप


मुलांच्या अंगा-खांद्यावर खेळतात नाग
मुंबई
साप हा विषारी प्राणी असल्याने प्रत्येकाची घाबरगुंडी उडते. पण महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे लोक सापांसोबत राहतात.या गावातील लहान मुलेही सापांशी लीलया खेळात असतात
पुण्यापासून 200 किमी लांब असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेटफळ नावाचे एक अनोखे गाव आहे. जिथे लोक सापांसोबत राहतात. इतकंच नव्हे तर, इथे सापांची फक्त पूजाच केली जात नाही तर लोक त्यांना घरात आसरादेखील देतात. शेटफळ हे एक असं गाव आहे जिथे साप सहज फिरत असतात आणि कोणीच त्यांना हटकत नाही. आश्चर्यांची बाब म्हणजे, या गावात 2,600 पेक्षा जास्त ग्रामस्थ आहेत. मात्र कोणालाही कोणत्याही प्रकारचे नुकसान पोहोचवत नाही. महाभयंकर कोब्राचेही इथे खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केले जाते. इथले गावकरी ना सापांना घाबरतात ना नागांना घाबरत. कारणहे साप देखील कोणालाच डसत नाहीत.शेटफळमधील ग्रामस्थांना सापाच्या वावरण्याची इतकी सवय झाली आहे की या विषारी प्राण्यासोबत ते बिनदिक्कत राहतात. इतकंच नव्हे तर, येथील स्थानिक नागरिक जेव्हा नवीन घर बांधतात तेव्हा घरातील एक कोपरा अशा पद्धतीने तयार करतात जेणेकरुन येथे साप येऊन राहू शकतील. गावातील कोणताही रहिवाशी घर बांधत असेल तर सापांसाठीदेखील व्यवस्था करतात.गावकरी सापाला पाळीव प्राणी मानतात. या गावातील लहान मुलं शाळेत जातानाही सापाला सोबत घेऊन जातात. लहान मुलांनाही सापांची भीती वाटत नाही.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!