दीपिका पदुकोणकडे गुड न्यूज ?


लंडन
अभिनेत्री दीपिका पदुकोणकडे गुड न्यूज असण्याचे संकेत मिळत असून दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग यांच्या जवळच्या व्यक्तीने त्यांच्या गर्भधारणेच्या बातम्यांना पुष्टी दिली आहे.लंडनमध्ये झालेल्या बाफ्टा समारंभात दीपिका प्रस्तुतकर्ता म्हणून सहभागी झाली होती. यावेळी तिने डिझायनर सब्यसाचीने डिझाइन केलेली चमकदार साडी परिधान केली होती. या सोहळ्यादरम्यान काढलेले दीपिकाचे साडीने पोट लपवण्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.
दोन महिन्यांपूर्वीच दीपिका पदुकोणने एका मुलाखतीत लवकरच कुटुंब सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आई बनण्याचा तिचा काही विचार आहे का, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर दीपिका म्हणाली होती, ‘नक्कीच, रणवीर आणि मला मुले खूप आवडतात. आम्ही दोघेही त्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत आहोत
दीपिका पदुकोणने 2018 साली रणवीर सिंहसोबत लग्न केले होते.5 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केले. दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंग गोलियों की रासलीला: रामलीला, पद्मावत, बाजीराव मस्तानी आणि 83 मध्ये एकत्र दिसले आहेत. नुकताच दीपिका पदुकोणचा फायटर हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, ज्यामध्ये ती हृतिक रोशनसोबत दिसत आहे. दीपिकाचे आगामी काळात सिंघम अगेन आणि कल्की 2898 एडी असे दोन मोठे चित्रपट आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!