रविवारी दृकश्राव्य गाता रहे मेरा दिल कार्यक्रम
देव आनंद जन्मदिनानिमित्ताने यादें सिने संगीत क्लबतर्फे आयोजन
सातारा
येथील यादें सिने संगीत क्लबतर्फे रविवार १४ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५.१५ वाजता न्यू इंग्लिश स्कुल सातारा येथील सभागृहात दृकश्राव्य गाता रहे मेरा दिल कार्यक्रम सादर केला जाणार आहे सुप्रसिद्ध अभिनेता कै. देव आनंद यांच्या २६ सप्टेंबर रोजी असलेल्या १०२ व्या जन्मदिनानिमित्ताने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे
हा कार्यक्रम दृकश्राव्य पद्धतीने सादर करण्यात येणार असुन देव आनंद यांच्या चित्रपटातील गीतांच्या जोडीला सुप्रसिद्ध चित्रपट समिक्षक पद्माकर पाठकजी यांचे अभ्यासपूर्ण निवेदन या कार्यक्रमाद्वारे रसिकांना ऐकायला मिळणार आहे.
सदरचा कार्यक्रम विनामुल्य आहे तरी त्याचा लाभ रसिकांनी घ्यावा असे आवाहन यादें क्लबचे अध्यक्ष इकबाभाई शेख यांनी केले आहे.

