रविवारी जयवंत दळवींवर विशेष कार्यक्रम


नगर वाचनालयातर्फे आयोजन
सातारा
प्रसिद्ध साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षांनिमित्त श्रीमंत छत्रपती प्रतापसिंग महाराज थोरले नगर वाचनालय सातारा यांच्यातर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे रविवार दिनांक 4 मे रोजी सायंकाळी सहा वाजता पाठक हॉल येथे हा कार्यक्रम होणार आहे कालचक्रावर स्वतःची मोहर उमटवणारा लेखक म्हणून ओळख असणाऱ्या जयवंत दळवी यांच्या साहित्यावर आधारित या कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन डॉक्टर आदिती काळमेख यांचे असून या कार्यक्रमामध्ये स्वतः अदिती काळमेख, वैदही कुलकर्णी ,अजय गिजरे, मिलिंद कांबळे आणि धनश्री भिडे सहभाग घेणार आहेत साहित्य प्रेमींनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे असे आवाहन नगर वाचनालयातर्फे अजित कुबेर, अतुल जोशी आणि अनंत जोशी यांनी केले आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!