साताऱ्यात आज पर्जन्यसूक्त कार्यक्रम
मसाप शाहूपुरी शाखेतर्फे आयोजन
Advertisement
सातारा
महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा यांच्या पुढाकाराने महाकवी कालिदास दिनानिमित्त चौघीजणी प्रस्तुत पर्जन्यसूक्त हा कार्यक्रम आज गुरुवार दिनांक 10 जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता नगर वाचनालय पाठक हॉल येथे होणार आहे मराठी साहित्यातील जुन्या नव्या कवींच्या लेखणीतून उतरलेल्या पाऊस कविता गप्पा आणि गाणी यांची सुरेल सफर असे या कार्यक्रमाचे स्वरूप असून शुभांगी दळवी डॉक्टर आदिती काळमेघ शुभांगी मदने आणि सविता कारंजकर हा कार्यक्रम सादर करणार आहेत सातारकर रसिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष विनोद कुलकर्णी कार्याध्यक्ष नंदकुमार सावंत उपाध्यक्ष अजित साळुंखे कार्यवाह चंद्रकांत बेबले कार्यवाह उमेश करंबळेकर कोषाध्यक्ष राजेश जोशी यांनी केले आहे
