राष्ट्रवादीने राज्यमंत्रीपद नाकारले
प्रफुल्ल पटेल यांना संधी न मिळण्याचे कारण
नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागलंय.आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा खुलासा केला आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल केलं होतं पण त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारलं असे कारण देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.
राष्ट्रवादीला 1 जागा देण्यात आली होती. प्रफुल्ल पटेल यांचं नाव फायनल केलं होतं. पण ते कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. त्यांना राज्यमंत्री करता येणार नाही असं त्यांचे मत होते. पण भविष्यात त्यांचा विचार होईल, असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे मोदी सरकार मधील सर्व मंत्र्यांचं मी अभिनंदन करतो. रक्षा खडसे, मुरलीअण्णा मोहोळ यांच्यासारखे तरूण खासदार मंत्रीमंडळात आहेत. प्रतापराव जाधवसारखे ज्येष्ठमंत्री असतील. त्यांचे अभिनंदन करतो, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटले आहे
आमच्याकडून ॲाफर दिली होती. पण राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं की पुढील वेळेस दिलं तरी चालेल. राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार अशी ॲाफर दिली होती, असा खुलासा देखील फडणवीसांनी केला आहे. अजित पवार गटाने थेट मंत्रीपदाची ऑफर नाकारल्याने आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. अजित पवार गटाला कॅबिनेट मंत्रीपदाची अपेक्षा होती, अशी माहिती देखील समोर आली आहे.आता राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गट) नाराजी आता भाजप कशी दूर करणार? असा सवाल विचारला जातोय.
