आयटीआय प्रवेश शनिवारपासून


राज्यात एक लाख 48 हजार 568 जागा उपलब्ध
मुंबई
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अंतर्गत येणाऱया राज्यातील शासकीय आणि खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय)मधील विविध ट्रेडसाठी शनिवार, 1 जूनपासून प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.व्यवसाय शिक्षण संचालनालयाकडून आयटीआयमधील प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे.
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाअंतर्गत राज्यात एपूण 418 शासकीय आणि 574 खासगी संस्थांच्या माध्यमातून आयटीआय चालवले जातात. यंदाच्या शैक्षणिक वर्षांमध्ये एक लाख 48 हजार 568 जागा उपलब्ध आहेत. यामध्ये शासकीय आयटीआयमध्ये 80 हून अधिक ट्रेडसाठी 92 हजार 264 जागा, तर खासगी आयटीआयमध्ये 56 हजार 204 इतक्या प्रवेशासाठी जागा उपलब्ध आहेत. यात सर्वाधिक जागा नाशिक विभागातील आयटीआयमध्ये 30 हजार 816 जागा उपलब्ध आहेत. त्याखालोखाल पुणे विभागामध्ये शासकीय आणि खासगी आयटीआयमध्ये 29 हजार 248 जागा उपलब्ध आहेत. त्यानंतर नागपूर विभागात 27,408 आणि त्यानंतर मुंबई, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती या विभागामध्ये प्रत्येकी 20 हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!