गदिमांच्या लेखणीला होता सुवर्णस्पर्श
वसंत व्याख्यानमालेमध्ये जयंत भिडे यांचे प्रतिपादन
सातारा
महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणून ओळख असलेले ग दि माडगूळकर यांच्या लेखणीला सुवर्णस्पर्श होता त्यामुळे त्यांनी जो लेखन प्रकार हाताळा तो लोकप्रिय झाला असे प्रतिपादन जेष्ठ कवी गीतकार जयंत भिडे यांनी केले ज्ञानविकास मंडळाच्या वसंत व्याख्यानमालेमध्ये गदिमांच्या साहित्यातील सौंदर्यस्थळे या विषयावर बोलताना त्यांनी गदिमांच्या एकूण साहित्यिक कारकीर्दीचा आढावा घेतला
गीत रामायणासारख्या अजरामर साहित्यिक कृतीमुळे जरी गदिमांशी प्रमुख ओळख असली तरी गदिमांनी दोन कादंबऱ्या काही कथासंग्रह लिहिले याव्यतिरिक्त चित्रपट गीतांमध्येही त्यांचे योगदान मोलाचे आहे माहितीही यावेळी जयंत भिडे यांनी दिली

साधी सोपी शब्दरचना, यमकांचा योग्य वापर आणि शब्दांच्या मध्यमातून तत्त्वज्ञान सांगण्याची वृत्ती यामुळे गदिमांचे साहित्य चिरंतन आणि लोकप्रिय झाले असे सांगून जयंत भिडे म्हणाले चित्रपट गीते लिहिण्याच्या उपक्रमामध्ये सुद्धा गदिमांनी कोठेही तडजोड केली नाही निर्मात्याने किंवा संगीतकाराने सांगितले म्हणून त्यांनी आपल्या गीतामध्ये कधीही बदल केला नाही गदिमांनी जे गीत लिहिले त्याला संगीतकारांनी चाल लावली आणि तेच लोकप्रिय झाले
जयंत भिडे म्हणाले ,आज इतक्या वर्षानंतर सुद्धा गीत रामायणाची लोकप्रियता कायम आहे आणि गदिमांच्या लेखणीतून उतरलेली चित्रपट गीते आजही लोकांच्या ओठावर आहेत हेच गदिमांचे मोठेपण आहे
यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून प्रमिला कुलकर्णी उपस्थित होत्या
ज्ञानविकास मंडळाचे प्रसाद चाफेकर यांनी सर्वांचे स्वागत केले गौतम भोसले यांनी प्रास्ताविक केले मोहन साठे यांनी आभार मानले
या व्याख्यानाच्या निमित्ताने ज्ञानविकास मंडळाच्या 51 व्या वसंत व्याख्यानमालेची सांगता झाली
