त्या आरोपीला निबंध लिहिण्याची शिक्षा
१५ दिवस वाहतुकीचे नियोजनही करावे लागणार
पुणे
पुण्यातल्या कल्याणी नगर जंक्शन या ठिकाणी रविवारी पहाटे नंबरप्लेट नसलेल्या पोर्श कारने मोटरसायकलला धडक दिली. ज्यामध्ये दोन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला. अश्विनी कोष्टा आणि अनिश अवधिया अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.तर ज्या पोर्शे कारने या दोघांना धडक दिली त्या कारचा चालक १७ वर्षांचा म्हणजेच अल्पवयीन आहे.त्याला न्यायालयाचा निबंध लिहिण्याचा आदेश दिला असून जमीन मंजूर करताना इतरही अटी घातल्या आहेत
कारचालक असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेतले होते आणि आरोपीला रविवारी दुपारी विशेष हॉलिडे कोर्टात हजर केलं होतं. पोलिसांनी त्याची रवानगी कोठडीत करण्यात यावी अशी मागणी केली. तसंच आरोपी साडेसतरा वर्षांचा आहे त्यामुळे त्याला प्रौढ समजून खटला चालवला जावा अशी मागणीही करण्यात आली. मात्र न्यायालयाने या आरोपीला जामीन मंजूर केला अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी दिली.
आम्ही पोलिसांना पूर्णपणे सहकार्य करणार आहोत असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. तसंच न्यायालयाने अल्पवयीन मुलाला कार अपघातावर निबंध लिहिण्यास सांगितलं आहे. अशीही माहिती देण्यात आली. आरोपीने १५ दिवस येरवडा विभागात ट्राफिक कॉन्स्टेबलसोबत वाहतुकीचं नियोजन करावं. अपघातावर त्यानं ३०० शब्दाचा निबंध लिहावा आणि मद्य सोडायला मदत होईल अशा डॉक्टरकडून उपचार घ्यावेत असं सांगितलंय. तसंच मानसोपचार तज्ज्ञांचे समुपदेशन घेऊन त्यासंदर्भात अहवाल न्यायालयात सादर करण्यास सांगितलं आहे, अशीही माहिती पाटील यांनी दिली.
