वडिलांनीच केला मुलाचा खून
मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याचा केला बनाव
जालना :
मराठा आरक्षणासाठी मुलाने आत्महत्या केल्याचे सांगत वडिलांनी पोलिसांत तक्रार केली. पण घटनेचा तपास केला असता वडिलांची मुलाचा खुन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जालना जिल्ह्यातल्या मुरमा गावात ही घटना घडली
शिवप्रसाद महादेव थुटे असे खुन झालेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारी 2024 रोजी मराठा आरक्षणासाठी मुलगा शिवप्रसाद महादेव थुटे याने राहत्या घरी आत्महत्या केल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी तीर्थपुरी पोलीस ठाण्यात दाखल केली. शिवप्रसाद महादेव थुटे हा जालना जिल्ह्यातील मुरमा गावातील रहिवाशी होता. याप्रकरणी वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवली. त्यावेळी शवविच्छेदनाच्या अहवालात मुलाचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले.
मुलाचा खुन झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी मयत मुलाच्या आई-वडिलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्यावेळी बापानेच दारुच्या नशेत मुलाचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी पोलिसांनी मुलाच्या वडिलांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली आहे. तसेच, या घटनेचा पोलीस पुढील तपास करत आहेत.
