भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर


२४ टक्के लोकसंख्या १४ वर्षांआतील

Advertisement

नवी दिल्ली
भारताची लोकसंख्या १४४ कोटींवर पोहोचली असून, यातील शून्य ते १४ वयोगटातील लोकसंख्या २४ टक्के आहे. ‘संयुक्त राष्ट्रे लोकसंख्या निधी’च्या (यूएनएफपीए) ताज्या अहवालात हा तपशील नोंदवण्यात आला आहे. भारताची लोकसंख्या ७७ वर्षांमध्ये दुप्पट होणार असल्याचा अंदाजही यात वर्तवण्यात आला आहे. ‘परस्परावलंबी जीवन, आशेचे धागे : लैंगिक आणि पुनरुत्पादक आरोग्य आणि अधिकारांमधील असमानता संपुष्टात आणणे’ असे या अहवालाचे शीर्षक आहे.
अव्वल स्थान कायम
– सन २०११मध्ये झालेल्या शेवटच्या जनगणनेत भारताची लोकसंख्या १२१ कोटी.यूएनएफपीए’च्या नव्या अहवालानुसार, १४४.१७ कोटी लोकसंख्येसह भारत सध्या जागतिक पातळीवर आघाडीवर आहे
दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या चीनची लोकसंख्या १४२ कोटी आहे
वयोगटनिहाय टक्केवारी
– ० ते १४ : २४
– १० ते १९ : १७
– १० ते २४ : २६
– १५ ते ६४ : ६८
– ६५ वर्षांवरील : ७
पुरुषांचे आयुर्मान ७१ आणि महिलांचे ७४ वर्षे आहे देशातील मातामृत्यूंच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात घट.जगभरातील अशा एकूण मृत्यूंपैकी भारतात केवळ आठ टक्के आहे

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!