अभिजीत बिचुकले रिंगणात


साताऱ्यात उमेदवारी अर्ज दाखल करणार
सातारा
भाजपाने साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर केली.आता बिग बॉस फेम अभिजीत बिचुकलेही रिंगणात उतरणार आहेत. १९ एप्रिल रोजी ते उमेदवारीचा अर्ज भरणार असल्याचं त्यांनी म्हटले आहे
अभिजीत बिचुकले म्हणाले, “मी एकच गोष्ट सांगतो की मी १९ तारखेला अर्ज भरणारच. भाजपाकडून तिकीट मिळावं अशी उदयनराजेंची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण झाली.शरद पवार आणि उदयनराजेंचं हाडवैर आहे. मी या सगळ्यांमध्ये एकटा लढतोय त्यामुळे यावेळी मला संधी द्या
“कुठला पक्ष, कुठले नेते, कोण कुणाचे कार्यकर्ते, सतरंज्या उचलणारे आहेत याचं मला काही घेणंदेणं नाही. २००४, २००९, २०१४, २०१९ या चार निवडणुका मी लढवल्या आहेत. माझं अस्तित्व दाखवून देण्याचा प्रयत्न केला. साताऱ्याच्या जनतेने २००९ मध्ये मला १२ हजारांहून जास्त मतदान केलं होतं. आताही तसंच मतदान होईल असं मला वाटतं.
मागच्या विधानसभा निवडणुकीतही अभिजीत बिचुकले यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. परंतु, तिथून त्यांचं डिपॉजिट जप्त झालं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!