भाजपचे ५ आमदार बिनविरोध
अरुणाचल विधानसभा निवडणुकीपूर्वीच निकाल
नवी दिल्ली
अरुणाचल विधानसभा निवडणुकीपूर्वीच अरुणाचलमध्ये भाजपचे ५ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये मुख्यमंत्री पेमा खांडू, उपमुख्यमंत्री चाऊना मिना यांच्यासह इतर ३ उमेदवारांचा समावेश आहे.भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री किरण रिजूजू यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. अरुणाचल प्रदेशच्या या निकालावरून देशाचा मूड लक्षात येतो, असं रिजूजू यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीसोबतच अरुणाचल प्रदेशात विधानसभेची निवडणूक देखील जाहीर झाली आहे.
अरुणाचलमध्ये विधानसभेच्या एकूण ६० जागा असून यासाठी १९ एप्रिल रोजी मतदान होणार असून २ जूनला निकाल जाहीर होणार आहे. दरम्यान, अरुणाचलमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा बुधवारी (ता. २७) शेवटचा दिवस होता. मात्र, ५ विधानसभेच्या जागांवर फक्त एकाच भाजपच्या उमेदवाराचा अर्ज आला.
