शिवतारे यांची स्क्रिप्ट कोणाची?


सुनील तटकरे यांचा सवाल

Advertisement

मुंबई
विजय शिवतारे आणि अजितदादा पवार यांचे व्यक्तीगत काही नाही. २०१९ मध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघातील संजय जगताप यांची कॉंग्रेसची जागा होती. कॉंग्रेसला विजयी करण्यासाठी आणि शरद पवारांबद्दल विजय शिवतारे यांनी जे उद्गार काढले ते अजितदादांना पटले नाहीत. मात्र आता बालवाडीतील लोक काहीही बोलत असतील त्यांना अजूनही शरद पवार कळायचे आहेत. परंतु त्यांची फारशी दखल आम्ही घेत नाही अशी मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी केली विजय शिवतारे जे बोलत आहेत त्यांचा तो राग आहे. मात्र काही लोकांना बरं वाटतंय. आता ही स्क्रीप्ट कुणाची आहे याचा शोध आम्ही घेत आहोत. मात्र मुख्यमंत्री आमच्या महायुतीचे नेते असून ते योग्य ती भूमिका घेतील असेही सुनिल तटकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे देताना सांगितले.
तेव्हा अजितदादांनी विडा उचलला आणि असे शत्रूत्व निर्माण झाले. ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, शरद पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते. आज जे टिकाटिपण्णी करत आहेत तशी वस्तुस्थिती नाही असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.
हर्षवर्धन पाटलांच्याबाबतीत काय घडले. २०१४ मध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे आणि कॉंग्रेसमुळे आम्ही स्वतंत्र लढलो. त्यामुळे दत्तामामा भरणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर अधिकृत निवडून आले. २०१९ मध्ये तीच परिस्थिती निर्माण झाली असे सांगतानाच पक्ष टिकवण्यासाठी अजितदादांनी केलेली मेहनत आणि आज जो पक्ष उभा आहे त्यात अजितदादा व्यतिरिक्त कुणाचे योगदान नाही. म्हणूनच इतके आमदार निवडून आणता आले आणि २०१९ मध्ये आमदार निवडून आणण्यामध्ये अजितदादा यांचा सिंहाचा वाटा होता असा स्पष्ट दावाही सुनिल तटकरे यांनी यावेळी बोलताना केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!