नवनिर्माण करणारी शाहिरी व कविता आज गरजेची
युवक निर्धार मेळाव्यात डॉ. भारत पाटणकर यांचे प्रतिपादन
सातारा समाजा समाजातील विषमता आम्हाला मान्य नाही. समता प्रस्थापित करणारे व जीवन सुंदर करणारे साहित्य आम्हाला हवे आहे. नवनिर्माण करणारी शाहिरी आणि कविता आम्हाला हवी आहे. नवनिर्माण करणारे , नवीन जग घडू शकेल असे वातावरण निर्माण करणारे आम्हाला हवे आहेत असा निर्धार युवकांनी करून आजचे जे सामाजिक वातावरण घडवून झाले आहे ते दुरुस्त केले पाहिजे आणि त्यासाठी म्हणून हा युवक निर्धार मेळावा महत्त्वाचा आहे असे मत विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्राच्या राष्ट्रीय समन्वय समितीचे मुख्य समन्वयक डॉ भारत पाटणकर यांनी व्यक्त केले.
सातारा येथील दैवज्ञ सांस्कृतिक भवन मध्ये सातारा येथे होणाऱ्या पंधराव्या विद्रोही साहित्य संस्कृती संमेलनाच्या निमित्ताने माझे संमेलन माझी जबाबदारी या टॅगलाईनसह युवक युवतींचा निर्धार मेळावा सातारा विद्रोहीच्या वतीने आयोजित केला होता. त्या मेळाव्यात उद्घाटन सत्रात डॉ भारत पाटणकर बोलत होते. प्रमुख उपस्थिती व मार्गदर्शन दंगलकार नितीन चंदनशिवे यांची होती. यावेळी या मंचावर पूजा भिसे आणावे या सुद्धा उपस्थित होत्या. प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी मी अंतिमतः भारतीय आहे. तुम्ही कोणत्याही रंगाचे झेंडे घेऊन या तिरंगा व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान हाच आमचा झेंडा व विचार आहे. अंधारलेल्या वाटेत विद्रोही चळवळच प्रकाश पेरेल असा आम्हाला विश्वास आहे असे सांगितले.
यावेळी दंगलकार नितीन चंदनशिवे यांनी काही कविता सादर केल्या.
यावेळी झालेल्या दुसऱ्या सत्रात एडवोकेट राजेंद्र गलांडे , एडवोकेट संतोष कमाने , गिरीश बनकर , गणेश वाघमारे , प्रा डॉ संजय साठे , विजय मांडके , शिवराम ठवरे मयूर खराडे यांची समयोचित भाषणे झाली.
प्रा गौतम काटकर यांनी हा निर्धार मेळावा आयोजित करण्यामागचा उद्देश प्रास्ताविकास सांगितला.
यावेळी प्रा आनंद साठे , जयवंत सोरटे , चेतन खराडे यांचा विद्रोही चे स्मृतिचिन्ह पुस्तक व गुलाब पुष्प देऊन डॉ. भारत पाटणकर व नितीन चंदनशिवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
दुपारच्या सत्रात अनेकांनी युवक निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने चर्चेत भाग घेऊन आपल्या सूचना व आपली मते मांडली
प्रारंभी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ जयसिंगराव पवार यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
राहुल गंगावणे यांनी सूत्रसंचालन केले. शुभम ढाले यांनी आभार मानले.
प्रारंभी सातारच्या विद्रोही कला मंच च्या वतीने शाहिरी जलसा अमित कांबळे व सहकाऱ्यांनी सादर केला. ढोलकी वर साथ मल्हारी गजभिये यांनी दिली. छोटे शाहीर आरुष कांबळे याच्या शाहिरीने उपस्थित भारावून गेले होते.
विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या सातारा जिल्ह्यातील युवक युवतींनी या निर्धार मेळाव्याचे संयोजन केले होते.
नाशिक जिल्ह्यातील भोंदू बाबा कॅप्टन अशोक खरात याच्यावर महिलांच्या लैंगिक शोषणाचे जे अनेक गुन्हे दाखल झाले आहेत . यास जे जे जबाबदार आहेत व ज्यांची ज्यांची नावे यात पुढे येत आहेत हे पाहता या संपूर्ण प्रकाराची न्यायालयीन चौकशी करणे गरजेचे आहे व या चौकशीमध्ये जे जे दोषी आढळतील त्या सर्वांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करणारा ठराव या मेळाव्यात डॉ भारत पाटणकर यांनी मांडला त्यास विजय मांडके यांनी अनुमोदन दिले. शिव शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात अशी भोंदूगिरी यापुढे चालू देणार नाही असाही निर्धार यावेळी युवकांनी केला.

