साताऱ्यात रविवारी ओ पी नय्यर यांच्या गीतांचा कार्यक्रम
सातारा
कलासरगम सातारा आयोजित सुप्रसिद्ध संगीतकार ओ पी नय्यर यांच्या मेलिडियस गीतांचा कार्यक्रम हा रविवार दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी ५-३० वाजता शाहू कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमाची संकल्पना ही अनुराधा पांडे यांची असून संयोजन हे अनिल वाळिंबे आणि डॉ. मेधा क्षीरसागर यांचे आहे.या कार्यक्रमात मुकुंद पांडे, ऍडवोकेट लक्ष्मीकांत अघोर, अरुण कुलकर्णी, प्रशांत कुलकर्णी, ऍडवोकेट आशुतोष वाळिंबे, मधु गिजरे, विजया चव्हाण, प्रिया अघोर, ऐश्वर्या गव्हाणे – पानसकर आणि ऍडवोकेट रेश्मा वाळींबे हे कलाकार स्वरसाज चढवणार आहेत. संगीत संयोजन हे राजेंद्र आफळे यांचे असून साथ संगत केदार गुळवणी ( व्हायोलीन / सतार ), सुनील गुरव ( सिंथ ), प्रशांत दयाळ ( ढोलक ), शांताराम दयाळ ( तबला ), अजय भोगले ( ऑक्टोपॅड ), स्वरा किरपेकर ( हार्मोनियम ), आशुतोष वाळिंबे ( ताल वाद्य ) यांची असणार आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऍडवोकेट सौ स्नेहल कुलकर्णी आणि ऍडवोकेट सौ. रेश्मा वाळिंबे करणार आहेत. ध्वनी व्यवस्था ही सुभाष कुंभार यांची आहे. सदर कार्यक्रम सर्वांना विनामूल्य असल्याने सर्व सातारकर रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.