प्रा. अजिंक्य सगरे यांचा आदर्श युवा पुरस्काराने गौरव


यशोदा इन्स्टिट्यूटचे लवकरच यशोदा विद्यापीठामध्ये रूपांतरण करणार

Advertisement

पुणे
यशोदा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष प्रा. अजिंक्य सगरे यांना यंदाचा आदर्श युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या शैक्षणिक क्षेत्रातील नाविन्यपूर्ण बदलांची आणि प्रयोगशील कर्तबगारीची सुयोग्य दखल म्हणून. हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला .यशोदा इन्स्टिट्यूटला ‘यशोदा विद्यापीठ’ बनवण्याचा आपला मानस असल्याची भावना यावेळी प्रा. अजिंक्य सगरे यांनी बोलून दाखवली
पुणे येथील नामांकित जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट च्या वतीने संपन्न होणाऱ्या आठव्या संसद परिषदेमध्ये या पुरस्कारांचे वितरण . त्यावेळी आमदार हेमंत पाटील, आमदार सत्यजित तांबे, आमदार कैलास पाटील यांच्यासोबत जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष शार्दुल जाधवर हे प्रमुख उपस्थित होते.
अभियंत्रिकीच्या तंत्रशिक्षणातील पदव्युत्तर पदवी प्राप्त केल्यानंतर सुद्धा कुटुंबातील शैक्षणिक वारसा अखंड चालू ठेवण्यासाठी सातारासारख्या ग्रामीण भागामध्ये दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी प्रखर प्रेरणा देणारे साताऱ्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील एक उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणजे प्रा. अजिंक्य दशरथ सगरे हे आहेत. प्रचंड आत्मविश्वास, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि पराकोटीची कृती शीलता आणि प्रगल्भ असा सकारात्मक दृष्टिकोन या माध्यमातून अजिंक्य सगरे हे यशोदा शिक्षण संस्था आणि यशोदा शिक्षण प्रसारक मंडळाच्या माध्यमातून सातारा परिसरामध्ये व्यावसायिक आणि तंत्रशिक्षणामध्ये नवनवीन बदल घडवून आणू पाहत आहेत.अल्पावधीमध्ये त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्याची दखल म्हणून विविध सामाजिक शैक्षणिक संघटनांकडून त्यांना गौरविण्यात आले आहे त्यामध्ये यशवंतराव चव्हाण विचार मंच सातारा यांच्यामार्फत प्राचार्य रमणलाल शहा पुरस्कार, माध्यम समूह तर्फे जनरेशन नेक्स्ट अवॉर्ड , कॉर्पोरेट एक्सलन्स अवॉर्ड यांचा प्रामुख्याने समावेश होतो.
शैक्षणिक क्षेत्रातील या कामगिरी सोबतच वैयक्तिक स्तरावर देखील संशोधनामध्ये विशेष रूची प्रा. अजिंक्य सगरे यांना आहे. पारंपरिक शिक्षण पद्धती आणि अत्याधुनिक अभ्यासक्रमांची सांगड घालत असताना केलेल्या नाविन्यपूर्ण बदलांच्या प्रयोगशील उपक्रमांसाठीच या व्यक्तिमत्त्वाला 31 जानेवारी 2025 रोजी पुणे येथे या पुरस्काराने गौरविण्यात आले.
यशोदा इन्स्टिट्यूट चे संस्थापक प्रा. दशरथ सगरे यांना त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यासाठी नुकताच राज्यस्तरीय कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. त्यांचा शैक्षणिक आणि वैचारिक वारसा अखंड पुढे चालवण्याचा आपला निर्धार आहे तसेच यशोदा इन्स्टिट्यूटला ‘यशोदा विद्यापीठ’ बनवण्याचा आपला मानस असल्याचे भावना देखील प्रा. अजिंक्य सगरे यांनी बोलून दाखवली


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!