क्रीडांगणावरील संस्कार विद्यार्थ्यांच्या करिअरसाठी पूरक- डॉ.अनिरुद्ध जगताप
सनशाईन स्कूलच्या विद्यार्थ्यांचे फुटबॉल स्पर्धेत उत्तुंग यश
सातारा
ग्रामीण व दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी तालुकास्तरावर आयोजित केलेल्या फुटबॉल स्पर्धेत गौरीशंकर ज्ञानपीठ संचालित सनशाईन इंग्लिश मीडियम स्कूलच्या (सी.बी.एस.ई नवी दिल्ली बोर्ड )विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे वय वर्षे 14 व वय वर्ष 17 गटात येथील मुले व मुलींच्या संघाने उत्तुंग यश मिळवले आहे जिल्हास्तरावरील होणाऱ्या स्पर्धेसाठी येथील खेळाडूंची निवड झाली आहे विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेल्या यशाबद्दल नुकतेच स्कूलमध्ये संस्थेचे संचालक डॉ.अनिरुद्ध जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी नितिन मुङलगीकर, जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्या प्रमिला टकले,क्रीडा शिक्षक विशाल निकम, कार्यालय अधीक्षक वैभव जठार अदि प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संस्थेचे संचालक डॉ. अनिरुद्ध जगताप म्हणाले की क्रीडांगणावरील संस्कार विद्यार्थ्यांच्या भावी जीवनासाठी व उज्वल करिअरसाठी ते पूरक ठरतात.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप, उपाध्यक्ष मिलिंद जगताप, संचालक जयवंतराव साळुंखे, आप्पा राजगे, कायदेशीर मॅनेजर रवी जगताप यांनी अभिनंदन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्राचार्या प्रमिला टकले यांनी मानले .
छायाचित्र ओळ
फुटबॉल स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थिनी समवेत डॉ. अनिरुद्ध जगताप, नितीन मुङलगीकर ,श्रीरंग काटेकर, प्रमिला टकले